मध्य प्रदेशमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उज्जैनमधील महिलेचा डेल्टा प्लस कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार तिने कोरोना लस घेतली नव्हती. तर कोरोना लस घेतलेला तिचा नवरा पूर्णपणे ठिक आहे.
डेल्टा प्लस कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यानंतर केरळ, मध्य प्रदेश या राज्यात सर्वाधिक डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आलेत. आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक 21, मध्य प्रदेश 6, केरळ 3, रुग्ण आढळून आलेत. याव्यतिरिक्त तामिळनाडूमध्ये 3 तर पंजाब, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर या राज्यांत प्रत्येकी एक रुग्ण सापडलेत.
केंद्र सरकारनं केरळ, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं योग्य आरोग्यविषयक उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे.