पिंपरी : सोशल मीडियावर भाईगिरी करणाऱ्यास चांगलेच महागात पडले आहे. पोलीस आयुक्तांचा आदेश झुगारुन स्वतः जवळ कोयता बाळगणाऱ्या गुन्हेगारास गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे.
स्वप्नील उर्फ युवराज सुरेश गायकवाड (23, रा. पाषाणकर बाग, पुणे) याला अटक केली आहे. गुंडा विरोधी पथकाचे अंमलदार रामदास कुंडलिक मोहिते यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; सोशल मीडियाचा गैरवापर गुन्हेगार करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे सायबर क्राइम आणि गुंडा विरोधी पथक अश्या गुन्हेगारांवर लक्ष देऊन आहे. गायकवाड याची सोशल मीडियावरील भाईगिरीची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे हरीश माने, अंमलदार नूरहजरात पठाण, प्रवीण तापकीर, मेडगे, तेलेवार, कदम, मोहिते या पथकाने गायकवाड याला अटक केली. त्याच्याकडून कोयता जप्त केला आहे.