4 कोटी 80 लाख रुपये कुंदन शिंदेकडे दिल्याची वाझेची कबुली

0

मुंबई : राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर सक्तवसुली संचालनालयाने (ED) छापे टाकले. बार मालकांनी मिळून काही महिने 4 कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिलीय. यानंतर ईडी अधिकाऱ्यांना मिळालेल्या धागेदोरेनुसार त्यांनी देशमुख यांचे कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे या दोन स्वीय सहाय्यकांना अटक केलीय. तर आता सचिन वाझेनं आपल्या जबाबात कुंदन शिंदे आणि संजीव पालांडेचं नाव घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सचिन वाझेंनीआपल्या जबाबात दिलेल्या माहितीनुसार की, 4 कोटी 80 लाख रुपये बार मालकांनी सचिन वाझेला दिले होते. तर सचिन वाझेने हेच पैसे कुंदन शिंदेला दिले. आणि कुंदन शिंदेने हे पैसे अनिल देशमुख यांना दिले असा एक मोठा खुलासा सचिन वाझेनं त्याच्या जबाबात केल्याचे ईडीच्या सूत्राकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान आजच कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांच्या रिमांड सुनावणीला मुंबई सत्र न्यायालयात सुरुवात झाली आहे. तर ईडीच्या बाजून वकील सुनिल गोंसावलीस बाजू मांडत असून त्यांनी दोघांची 7 दिवसांची ईडी कोठडीची मागणी केलीय.

मुंबई हाय कोर्टात 3 जनहित याचिका दाखल दाखल केल्या असून या याचिकेवर दिलेल्या आदेशावर CBI ने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली आहे. तर PMLA कायदा -50 नुसार अनिल देशमुख यांचा जबाब ED ने नोंदवला आहे. याच कायद्यांतर्गत बरोबर आणखी ही काही जणांचे जबाब इडीने (ED) नोंदवले आहेत. तर CBI ने दाखल केलेल्या एफआरआय अंतर्गत ईडीने ईसीआर नोंदविला केला आहे. ईडीचा (ED) ईसीआर हे सार्वजनिक दस्तऐवज नसतात. ईसीआर दाखल केल्यानंतर आम्ही चौकशी करता आरोपींना समन्स केले होते. संजीव पालांडे हा देशमुख यांचा स्वीय सहाय्यक आहेत तर कुंदन पालांडे हा अनिल देशमुख यांचा असिस्टंट आहे. बार मालकांकडून पैसे काढायचे असा आरोप यांच्यावर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.