पुणे शहरात सायंकाळी 5 नंतर संचारबंदी

0

पुणे : राज्य सरकारनं डेल्टा व्हेरिएंटच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र अनलॉकबाबतची नवीन नियमावली जारी केली असुन दुकाने आणि इतर आस्थापनांबाबतच्या वेळेत बदल केला आहे. त्याच पार्श्वभुमीवर पुण्यात देखील महानगरपालिकेने नवीन आदेश  निर्गमित केले आहेत. दरम्यान, पुण्यात सायंकाळी 5 नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याबाबतचं ट्विट पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.

पुणे शहरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध असेल तसेच सायंकाळी 5 नंतर संचारबंदी लागू (Curfew in Pune after 5 pm) राहील. या काळात अत्यावश्यक कारण वगळता बाहेर पडता येणार नाही. पुण्यातील सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत.

सायंकाळी ५ नंतर संचारबंदी !

पुणे शहरात सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध असेल तर सायंकाळी ५ नंतर संचारबंदी लागू राहील. या काळात अत्यावश्यक कारण वगळता बाहेर पडता येणार नाही.

— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 26, 2021

इतर नियमावली खालील प्रमाणे…..

1. पुणे मनपा क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवामधील नमूद दुकाने ही आठवडयातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

2. अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.
शनिवार व रविवार पुर्णतः बंद राहतील.

3. मॉल, सिनेमागृह, नाटयगृह, संपूर्णतः बंद राहतील

4. रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रारी दुपारी 4 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. दुपारी 4 नंतर तसेच
शनिवार व रविवार फक्त पार्सल सेवा / घरपोच सेवा रात्री 11 पर्यंत सुरू राहील.

5. लोकल ट्रेन मधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी,
शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा, बंदरे सेवा यांच्या कर्मचार्‍यांना प्रवास करणे परवानगी राहील.

6. पुणे मनपा क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे (उद्याने), खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवडयातील सर्व दिवस सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहील.

7. सुट देण्यात येत असलेल्या आस्थापना / सेवा व्यतिरिक्त सर्व खासगी कार्यालये कामाचे दिवशी 50 टक्के कर्मचारी क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

8. पुणे मनपा क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा व कोविड-19 व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरू राहतील.

9. सर्व आऊटडोअर स्पोर्ट्स सर्व दिवस सकाळी 5 ते 9 या वेळेत सुरू राहतील.

10. सामाजिक, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रम यास 50 लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत परवानगी राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.