केंद्राकडून आठ नवीन मदत योजनांची घोषणा

कोविड प्रभावित सेक्टरसाठी 1.1 लाख कोटी लोन गॅरेंटी

0

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांनी आज आठ मदत योजनांची घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांनी सर्वात आधी हेल्थ सेक्टरशी संबंधित एका नव्या मदत योजनेच्या पॅकेजची घोषणा केली. कोविड प्रभावित सेक्टरसाठी 1.1 लाख कोटी लोन गॅरेंटी स्कीमची घोषणा केली आहे.

कोरोना संकटामुळे उद्भवणाऱ्या आर्थिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी कोविड -19 मुळे प्रभावित क्षेत्रांसाठी 1.1 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. या पॅकेज अंतर्गत आरोग्य सेवा क्षेत्रासाठी 50000 कोटी आणि इतर क्षेत्रांसाठी 60000 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत.

– आरोग्य क्षेत्रासाठी असलेल्या कर्जावरील व्याज दरवर्षी 7.95 टक्क्यांहून अधिक असणार नाही.

– इतर सेक्टर्ससाठी व्याज 8.25 टक्क्यांहून अधिक नसेल.

– लोन गॅरेंटी स्कीम अंतर्गत हेल्थ सेक्टरसाठी अधिकतर 100 कोटी कर्ज रक्कम ठेवण्यात आली आहे. तर यावर अधिकाधिक 7.95 टक्के व्याजदर असेल. इतर सेक्टर्ससाठी अधिकतर व्याज 8.25 टक्के असून या याच्या कव्हरेजमध्ये गरजेनुसार बदल केले जातील.

– लहान व्यावसायिक, एनबीएफसी मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूटकडून 1.25 लाख पर्यंतचं कर्ज घेण्यास सक्षम असतील.

– यावर बँकेच्या एमसीएलआरवर अधिकतर 2 टक्के जोडून व्याज आकारलं जाऊ शकतं.

– या लोनचा कालावधी 3 वर्ष असेल आणि सरकारी गॅरेंटी असेल. नवीन कर्ज वितरित करणं हा यामागचा प्रमुख हेतू आहे.

– 25 लाख लोक या स्कीमचा फायदा घेऊ शकतात. जवळपास 7500 कोटी रुपयांची तरतूद केली जाईल. 31 मार्च 2022 पर्यंत याचा लाभ मिळेल.

पर्यटन क्षेत्र भारतासाठी अतिशय महत्त्वाचं असल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या. हे क्षेत्र रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध करतं. आर्थिक मदत टूरिस्ट गाईड्स आणि इतर स्टेक होल्डर्ससाठी केली गेली आहे. यामुळे कार्यरत भांडवल उपलब्ध होईल. वैयक्तिक कर्ज, तसंच नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठीही याचा लाभ होईल. 100 टक्के गॅरेंटी सरकारकडून दिली जाईल. 10 लाख रुपये प्रति एजेन्सीपर्यंत दिले जातील. तर लायसेंस्ड टूरिस्ट गाईडला 1 लाख रुपये दिले जातील. यात कोणताही प्रोसेसिंग चार्ज किंवा क्लोजर चार्ज द्यावा लागणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.