पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तीन पोलीस निरीक्षकांना सलग्न करण्यात आल्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी काढले आहेत.
जनसंपर्क अधिकारी पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांना वाहतूक विभाग, हिंजवडी येथे, हिंजवडी वाहतूक विभाग पोलीस निरीक्षक सुनील दहीफळे यांना हिंजवडी पोलीस निरीक्षक (गुन्हे) आणि अजय जोगदंड पोलीस निरीक्षक हिंजवडी (गुन्हे) यांना आर्थिक गुन्हे शाखेला सलग्न करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गुरुवारी रात्री उशिरा याबाबत आदेश काढले आहेत.