पिंपरी :फुटपाथवर रंगीत पेव्हींग ब्लॉक बसविण्याचे, पावसाळी गटाराची सुधारण करण्याचे तसेच स्मशानभुमीचे नुतनिकरणाच्या बोगस एफडीआर आणि बैंक गॅरेंटी दिल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड़ महापालिकेच्या वतीने तीन ठेकेदाराविरुद्ध पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रविण सोपानराव बागलाणे (57 रा . सी बिल्डींग एम्पायर स्कवेअर ऑटोक्लस्टर जवळ , चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार मे . त्रिमुर्ती कन्स्ट्रक्शनचे संदिप सुखदेव लोहार (रा. हार्मोनी बिल्डींग प्लॉट नं-39 पंचवटी कॉलनी तळेगाव दाभाडे), मे. भैरवनाथ कन्स्ट्रक्शनचे नंदकुमार मथुराम ढोबळे (34 रा. शिवराज हौसिंग सोसायटी जवळ , रुपीनगर पो.स्टे मागे निगडी), मे.दत्तकृपा एंटरप्राइजेसचे दत्तत्रय महादेव थोरात (39 रा . थोरात सायकल मार्ट जवळ दत्तनगर चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील आरोपी संदिप लोहार याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे डांगे चौक ते बिर्ला हॉस्पीटल या रस्त्याचे फुटपाथवर रंगीत पेव्हींग ब्लॉक बसविण्याच्या कामाची 1,24,53,431 रुपयाची निवीदा भरुन त्यासाठी निवीदा भरुन त्यासाठी टीजेएसबी बँक आळंदी शाखेचा (एफ.डी.आर. क्र.सीएफ / 3745/3) दिनांक 9 मार्च 2020 रोजी 2 ,50,000 रूपयांचा खोटा व बनावट एफ.डी.आर तयार करुन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सादर केला, तर आरोपी नंदकुमार मथुराम ढोबळे याने चक्रपाणी वसाहत महादेव नगर व परिसरामध्ये पावसाळी गटाराची सुधारण करण्यासाठी त्या कामाची30 ,35,783 रुपयाची निवीदा भरुन त्यासाठी टीजेएसबी बॅक आळंदी शाखेचा (एफ.डी.आर. क.सी.एफ. 4179/ 2) रक्कम रुपये 61,000 / – रक्कम रुपये 10. 37000 रुपयांचे खोटे व बनावट एफ.डी.आर तयार केले तसेच आरोपी दत्तत्रय महादेव थोरात याने पिंपरीतील भाटनगर हिंदु स्मशानभुमीचे नुतनिकरण करण्यासाठी कामाची 83,12,017रुपयाची निवीदा भरुन त्यासाठी आयसीआयसीआय बँक पंचशिल टेकपार्क विमाननगर शाखेची बॅक गॅरंटी दिनांक 4 एप्रिल 2019 .रोजी 10,80000 एफ.डी.आर व बँक गॅरंटी रक्कम रुपये 1,67000 ( एस.डी ) या खोट्या व बनावट तयार करुन पिंपरी चिचवड महानगरपालिकेला सादर करून फसवणूक केली आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.