विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष

0

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वरून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा राजकीय आमदारांचा आकडेवारीचा खेळ पावसाळी अधिवेशनात सर्वांचे लक्ष वेधणार आहे. विधानसभा अध्यक्षपद हे नाना पटोले यांच्या काँग्रेस पक्षाध्यक्ष नियुक्तीनंतर रिक्त आहे. आता काँग्रेसने येत्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर करावी यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले त्यावेळेस बहुमताचा आकडा सिद्ध करताना महाविकास आघाडी कडे 172 आमदार होते. आता कोविड कालावधीत काँग्रेस पक्षाच्या एका आमदाराचे निधन झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडे पंढरपूरची असलेली जागा भाजपाने जिंकत राष्ट्रवादीचा आमदार एक कमी झाला आहे

तर भाजपची संख्या वाढली मात्र त्याच दरम्यान एका आमदाराचा पाठिंबा कमी झाला आहे. अपक्ष निवडून आलेल्या गीता जैन यांनी शिवसेनेला पाठिंबा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर होताना महाविकास आघाडीला सरकार स्थापन करताना जितकी संख्याबळ होतं तितकीच त्यांच्याकडे कायम राहीलं हे दाखवून आव्हान असणार आहे.

संख्याबळ हे महाविकास आघडी सरकारच्या बाजूने असल्याचा दावा महाविकास आघाडी करत आहे. महाविकास आघडीकडे सध्या 171 संख्याबळ आहे. महाविकास आघाडीकडून अधिकच्या मताने अध्यक्ष होईल असा दावा मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाकडून संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर आहे. तर पृथ्वीराज चव्हाण ही या पदासाठी दिल्लीत प्रयत्न करत असल्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.