पिंपरी : गुंडा विरोधी पथकाने आणि खंडणी विरोधी पथकाने केलेल्या दोन गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
गुंडा विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमध्ये निलेश विजय गायकवाड (25, रा. रामनगर झोपडपट्टी, वारजे, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी निलेश हा जाधववस्ती, रावेत येथील डी मार्टच्या मागे पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि त्यांच्या पथकाने सापळा लावून कारवाई केली.
निलेश कडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा 51 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. वरील दोन्ही प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
खंडणी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत बालाजी उर्फ रामा नारायण उपगंडले (33, रा. थेरगाव) याला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास आरोपी भोंडवेवस्ती, रावेत येथे पिस्तूल घेऊन आल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून बालाजी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे असा 40 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त केला.