काळविटाची शिंगे विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

0

पिंपरी : काळविटाची शिकार करून शिंगे विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली. वडगाव घेनंद फाटा, शेवगाव ( ता. खेड ) याठिकाणी शुक्रवारी (दि.2) पहाटे सव्वा तीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी पोलीस नाईक लक्ष्मण नानाजी आढारी यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन गजानन राठोड (22, रा. यवतमाळ) व सागर रामराव मात्रे (23, रा. यवतमाळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी इलेक्ट्रॉनिक तारेच्या सहाय्याने काळविटाची शिकार केली. व पाच जोड शिंगे विक्रीसाठी जवळ बाळगली होती. शिंगे विक्री साठी जात असताना आढळून आले. या शिंगांची किंमत पाच लाख रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहाय्यक निरीक्षक अंबरिष देशमुख, सिद्धनाथ बाबर आणि त्यांच्या पथकाने केली आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.