मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली. जवळपास १५ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला. आता आमिर खानची मुलगी इरा खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
इरा खान ही आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे. आमिर आणि रीना यांच्या घटस्फोटानंतरही इराचे वडिलांसोबत चांगले बाँडिंग आहे. ती बऱ्याच वेळा सावत्र आई किरण राव आणि आमिर खान यांच्यासोबत वेळ घालवताना दिसत होती. वडील आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाच्या निर्णयानंतर काही वेळातच इराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.
इराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सेल्फी शेअर केला आहे. या फोटोवर तिने ‘पुढचा रिव्ह्यू उद्या! पुढे काय होणार आहे?’ असे म्हटले आहे. इराने ही पोस्ट कोणासाठी केली आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ती नक्की कोणाविषयी बोलत आहे? हे देखील इराने पोस्टमध्ये सांगितलेले नाही.