नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत आहे. मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे, प्रीतम मुंडे यांची वर्णी लागणार असल्याचं सांगितलं जातंय तर मध्य प्रदेशातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा समावेश होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, हे तिघेही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी दाखल झाल्याचं वृत्त आहे.
आज सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान केंदीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यापुर्वी पीएम मोदी संभाव्य मंत्र्यांची भेट घेत आहेत. सुमारे 17 ते 22 नवे मंत्री आज शपथ ग्रहण करतील अशी चर्चा आहे. त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ देतील. गेल्या काही दिवसांपासुन केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा सुरू होती.
महाराष्ट्रातून नारायण राणे, हिना गावित यांची वर्णी लागणार अशी चर्चा होती. मात्र, सध्यातरी नारायण राणे आणि दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची मुलगी खासदार प्रीतम मुंडे हे पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.