केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तार : जवळपास 43 मंत्र्यांचा शपथविधी आज

मंत्रीमंडळ विस्तारापूर्वीच 4 मंत्र्यांचे राजीनामे

0

दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात संध्याकाळी सहा वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राजधानी दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही नेत्यांकडून मंत्रिपद काढून घेतलं आहे. तर काहींना नवीन जबाबदारी दिली आहे. तर काही नवख्या नेत्यांना मंत्रिमंडळात पहिल्यांदाच संधी दिली जाणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी जवळपास 43 मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे.

मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्यांमध्ये ज्या नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. विद्यमान मंत्रिमंडळातून अनेकांच्या राजीनाम्याचं वृत्ता आलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातून धोत्रे आणि दानवे यांचा राजीनामा मागवण्यात आला आहे. त्याशिवाय केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडून मंत्रिपद काढून घेतलं आहे. प्रकृती अस्वस्थेमुळे निशंक यांच्याकडून मंत्रिपद काढून घेण्यात आलं आहे. पश्चिम बंगालच्या खासदार देबोश्री चौधरी यांनाही डच्चू देण्यात आल्याचं बोललं जात आहे.

पश्चिम बंगालमधून इतर चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांच्याकडूनही मंत्रिपद काढून घेण्यात आलं आहे. कर्नाटकमधील राजकीय अस्थिरतेमुळे केंद्रानं मंत्रिपद काढून घेतलं आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. उत्तर प्रदेशमधून इतर चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते.

मिशन-२०२४ डोळ्यांसमोर ठेवून भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे निश्तिच केल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार करताना विविध राज्यांच्या विधानसभा आणि २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने भाजप रणनीती आखताना दिसत आहे.

उत्तर प्रदेशसह पाच महत्त्वाच्या राज्यांतील विधानसभा निवडणुका होत असून, त्यानुषंगाने केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह महत्त्वाचे मंत्री आणि भाजपा नेत्यांची बैठक बोलावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.