‘खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवय’

0

मुंबई : पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन केंद्र आणि राज्यातील टॅक्सवरुन आरोप प्रत्यारोप आणि दावे होत आहेत. यातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा खोडून काढत आमदार रोहित पवार यांनी पोलखोल केली आहे. देशात कुठेही तुमची चलाखी चालेल पण महाराष्ट्रात चालणार नाही, अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहीत पवार यांनी फडणवीस यांना सुनावलं आहे. पेट्रोलवरील करासंदर्भात फडणवीस यांचा दावा खोडून काढत, ‘खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे’ असा घाणाघात केला आहे.

मागील काही दिवसांपासून देशात आणि राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. पाच राज्यातील निवडणुकीनंतर 35 वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. यावरुन विरोधकांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपचे नेतेही आपला बचाव करताना दिसत आहे.

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरुन राज्य आणि केंद्रामध्ये आरोप, प्रत्याआरोपाच्या फैरी आणि दावे झडले आहेत. असाच एका दावा करताना राज्यातील इंधन दरवाढीला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवसी यांनी केलं होतं. फडणवीस यांचा दावा खोडून काढत रोहित पवार यांनी त्यांना चांगलेच सुनावलं आहे.

फडणवीस काय म्हणाले होते? पुण्यातील कार्यक्रमात महागाईच्या मुद्यावरुन बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला टार्गेट केलं. पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात, असे विधान यावेळी त्यांनी केलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.