भारती विद्यापीठ परिसरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या रूममध्ये स्पाय कॅमेरा लावणारा कोण ?;
वाचा सविस्तर...
पुणे : भारती विद्यापीठ परिसरातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या रूममध्ये स्पाय कॅमेरा लावल्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी शहरातील एका एमडी डॉक्टरला अटक केली असून त्याने हे छुपे कॅमेरे लावल्याचे समोरे आले आहे.
सुजित आबाजीराव जगताप (वय 42) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय पीडित महिला डॉक्टरने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 6 जुलैला घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजित जगताप हा एमडी डॉक्टर आहे. त्याचा हिराबाग येथे दवाखाना असून भारती विद्यापीठ परिसरातील एका हॉस्पीटलमध्ये लेक्चर घेतो. दरम्यान, यातील फिर्यादी प्रशिक्षणार्थी डॉक्टर
फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेल्यानंतर लाईट लावली.
पण, तो बल्ब लागला नाही. बल्ब पाहिला असता तो काहीसा वेगळा वाटल्याने त्यांना शंका आली.
त्यांनी इलेक्ट्रिशियनला बोलावून बल्ब दाखवला, तेव्हा इलेक्ट्रिशियनने त्या बल्बमध्ये छुपा कॅमेरा असल्याचे सांगितले. त्यानंतर हा प्रकार समोर आला होता.
पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तसेच येथील सुरक्षा रक्षक आणि फिर्यादी यांना संशय वाटत असलेल्या व्यक्तींकडे चौकशी करत होते. यादरम्यान एका ठिकाणी जगताप कैद झाले. त्यांना चौकशीसाठी बोलविल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठाडी सुनावली आहे.