माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची 4 कोटी 20 लाखाची मालमत्ता जप्त

0
मुंबई  : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयनं (ईडी) मोठा दणका दिला आहे. ईडीनं अनिल देखमुख आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित तब्बल 4 कोटी 20 लाख रूपयांची अचल मालमत्ता जप्त केली आहे. ईडीनं दाखल असलेल्या गुन्हयात पीएमएलए अंतर्गत कारवाई केली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. यापुर्वी अनिल देशमुख यांची ईडीकडून अनेक वेळा चौकशी देखील झाली आहे.एवढेच नव्हे तर ईडीनं अनिल देशमुख यांच्या पत्नीला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स देखील बजावले होते.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे चांगलेच अडचणीत आले.
Leave A Reply

Your email address will not be published.