स्पाय कँमेरा लावणा-या डॉक्टरला जामीन मंजूर

0

पुणे  : प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या स्नानगृह आणि शयनकक्षात स्पाय कँमेरा लावणा-या डॉक्टरला ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला. सुजित आबाजीराव जगताप असे या डॉक्टरचे नाव आहे.
जगताप विरोधात डॉक्टरविरुद्ध आयटी अँक्टसह विविध कलमांनुसार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.

 

जगताप हा मेंदूविकारतज्ञ आहे. भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये तो लेक्चरर आहे. त्यातून त्याची महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरांशी चांगली ओळख झाली. त्याने त्यांच्याशी बोलताना नकळतपणे त्यांच्या  खोलीच्या चावीचे ठसे घेतले. त्याने त्यांच्या खोलीची बनावट चावी तयार करून घेतली. महिला डॉक्टर हॉस्पिटल असल्याचे पाहून त्याने बनावट चावीद्वारे खोली उघडून त्यांच्या स्नानगृह व शयनकक्षात कँमेरा असलेले बल्ब लावले होते.

 

गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. आरोपीला जर जामिनावर सोडले तर तो तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल. तसेच एका हॉस्पिटलमध्ये काम करीत असल्याने तो तक्रारदाराला धमकावण्याची शक्यता आहे. त्याला दिलेल्या स्वातंत्र्याचा तो गैरफायदा देखील घेऊ शकतो. त्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करावा, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. मात्र, आरोपीच्या वकिलांनी सांगितले की, ज्या कलमान्वये आरोपींवर दोषारोप आहे तो गुन्हा जामीनपात्र आहे.

गूणदोषानुसार खटल्याच्या निकालात बराच कालावधी लागणे शक्य आहे. आरोपीला जामिनीवर न सोडल्यास त्याच्या व्यवसायावर विपरीत परिमाण होईल. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला. आरोपीच्या बाजूने ॲड. सुधीर शाह, ॲड. सारथी पानसरे, ॲड. तेजलक्ष्मी धोपोकर आणि ॲड. सूरज इंगळे यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.