जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली यांच्या पादुका ‘शिवशाही’तून पंढरपूरकडे मार्गस्थ

0

पिंपरी : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली यांच्या पादुका आषाढी वारीसाठी आज (सोमवारी) सकाळी शिवशाही बसने पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. आकर्षक लक्षवेधी विविध रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीने सजलेल्या दोनएसटी बसने संस्थानचे पदाधिकारीमानकरी, वारकरी, टाळकरी असे 40 वारकरी सहभागी झाले आहेत. बस सोबत पोलीसबंदोबस्त ठेवला आहे.

आषाढी एकादशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला श्रीक्षेत्र पंढरपूरची ओढ लागलेली असते. हरिभक्तीच्या छंदात दंग होऊन, विठूनामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन  पायी श्री विठ्ठलाच्या भेटीला जातात. मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचेसावट आहेवारीची परंपरा जपण्यासाठी एसटी बसमधून पादुका पंढरपूरला नेण्यास परवानगी दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कायमअसल्याने पंढरीची वारी पायी चालत होता, एसटीच्या सजविलेल्या बसने होत आहे. महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी पादुका बसनेजात आहेत.

तुकोबा आणि माउलींच्या पादुका पंढरीला जाण्यास निघण्यापूर्वी मंदिरात सकाळी पाच वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमझालेफुलांनी सजवलेल्या दोन एसटी बसमधून पादुका मार्गस्थ झाल्या. एका बसमध्ये 20 असे 40 वारकरी बसमध्ये आहेत. पादुकांसोबत पालखी सोहळा प्रमुख, संस्थानचे अध्यक्ष, चोपदार, विणेकरी, पालखीचे भोई, चौघडा, शिगाडे, गरुडटक्का, पताकाधारकवारकरी, पखवाज वादक, टाळकरी असे 40 वारकरी बसमधून पंढरपूरला निघाले आहेतया बस समवेत पंढरपूर पर्यंत परत येईपर्यंतपोलिस बंदोबस्त तैनात राहणार आहे. चार वाजेपर्यंत वाखरीत बस पोहचतील असे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.