मुंबई : तुम्ही जर गेल्या महिन्यात किंवा या महिन्यात महिंद्रा अँड महिंद्रा वाहन खरेदी केले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण महिंद्राने जवळपास 600 डिझेल कार परत मागवल्या आहेत म्हणजेच त्या ग्राहकांकडून माघारी घेतल्या आहेत. कंपनीला या कारच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा संशय आहे.
महिंद्राचे म्हणणे आहे की, या डिझेल वाहनांच्या इंजिनातील चूक लक्षात आली. यामुळे कंपनीने या गाड्या माघारी बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. या वाहनांची संख्या 600 च्या जवळपास आहे. ही वाहने 21 जून ते 2 जुलै 2021 दरम्यान कंपनीच्या नाशिक प्लांटमध्ये तयार केली गेली आहेत. यापूर्वीही महिंद्राच्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या थारच्या डिझेल व्हेरियंटमध्येही एक दोष आढळला होता.
कंपनी या 600 परत मागवलेल्या वाहनांच्या सदोष डिझेल इंजिनची तपासणी आणि त्यात दुरुस्ती करुन पुन्हा बसवणार आहे. कंपनीकडून सांगण्यात आले आहे, कारखान्यात ठराविक तारखेला सापडलेल्या दूषित इंधनामुळे इंजिनच्या भागांचे अचानक बिघाड होत असल्याची शंका महिंद्राकडून व्यक्त केली जात आहे. कोणत्या मॉडेलमध्ये हे दोष होते, हे कंपनी महिंद्राने स्पष्ट केले नाही. मात्र, एका ठराविक कालावधीत घेतलेल्या गाड्यांमध्ये हा दोष असल्याचे म्हटले आहे. महिंद्राने म्हटले आहे की, 21 जून ते 2 जुलै 2021 दरम्यान निर्मित 600 पेक्षा कमी वाहनांच्या मर्यादित बॅचसाठी ही प्रक्रिया लागू आहे.
महिंद्राचे म्हणणे आहे की, वाहनांच्या इंजिनमध्ये कोणत्याही प्रकारची तपासणी आणि दुरुस्तीसाठी ग्राहकांकडून पैसे घेतले जाणार नाहीत, हे त्यांच्यासाठी अगदी विनामूल्य असेल. कंपनी वैयक्तिकरित्या ग्राहकांशी संपर्क साधून त्यांना याविषयी माहिती देईल. एम अॅण्ड एम ही देशातील पाचव्या क्रमांकाची ऑटो मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. ही गाडी सध्या आपल्या नाशिक प्लांटमध्ये थार, स्कॉर्पिओ, मराझो आणि एक्सयूव्ही 300 सारख्या युटिलिटी वाहनांची निर्मिती करते.
महिंद्राने गेल्याच आठवड्यात आपली नवीन एसयूव्ही, बोलेरो निओ, टीयूव्ही 300 एसयूव्हीची नवीन आवृत्ती आहे. याशिवाय महिंद्रा लवकरच एक्सयूव्ही 700 ही फ्लॅगशिप SUV XUV 500ची अपग्रेड केलेली आवृत्ती नव्या अवतारात बाजारात आणणार आहे.