मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा करण्यात आली. “पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे”, असं साकडं मुख्यमंत्र्यांनी विठुरायाला घातलं.
मुख्यमंत्री स्वत: काल कार ड्राईव्ह करून पंढरपूरला गेले आणि त्यांनी आज पूजाविधी केले. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मात्र खोचक टोला लगावला.
उद्धव ठाकरे विठ्ठलाच्या पुजेला निघाले तेव्हा अनेक माध्यमांनी ते स्वत: कार चालवत निघाल्याचे दाखवलं. ते आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे हे दोघे लँड रोव्हरने पंढरपूरला पोहोचले.
याच मुद्द्यावरून मनसेने खोचक ट्वीट केले. “हे बा विठ्ठला जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे. आणि जशी तुझी भेट घेतली तशी एकदा जनतेशी पण भेट घेउदे हीच तुझ्या चरणी प्रार्थना. पांडुरंग… पांडुरंग..”, असं टोला संदीप देशपांडे यांनी लगावला.