उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

0
पिंपरी  : उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोहन नगर, चिंचवड येथे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज चोपदार ह्यांच्या प्रयत्नाने रक्तदान शिबिर पार पडले.
वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडच्या युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वायफळ खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपत व कोरोना संकटात वैद्यकीय क्षेत्रात सध्या रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे याची गरज ओळखून  भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. आज शहरात अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते आमदार बनसोडे यांनी शहरातील बऱ्याच कार्यक्रमांना उपस्थित राहून अजित दादांचा वाढदिवस कोरोना काळात अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज चोपदार यांनी भरवलेल्या रक्तदान शिबिरास आमदार बनसोडे यांनी वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाचे कौतुक केले.तसेच करोना  संकटात आपल्या जीवाची परवा न करता अहोरात्र रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानत कार्य करणाऱ्या डॉक्टर्स ,परिचारिका यांच्याशी आमदार साहेबांनी संवाद साधत त्यांच्या कार्याला सलाम केला.
यावेळी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विशाल काळभोर, विशाल वाकडकर, सौ वैशाली काळभोर, शिवराज रानवारे, हितेश मोरे, संजय जगताप, राहुल दातीर- पाटील, सोमनाथ अलानकर, प्रसाद कोलते, आयुष निंबाळकर, निखिल दळवी, गणेश पटेल, योगेश हुंबारे, महादेव नेर्लेकर, रंजीत आवटे, कुणाल रावडे, अजिंक्य जगताप, प्रतिक इंगळे, निलेश , शिवम, योगेश, रिजवान, अनिल इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. या शिबिरासाठी जय हनुमान तरुण मंडळ, खोडा चा गणपती, श्री गणेश मित्र मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले.
Leave A Reply

Your email address will not be published.