पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह मावळात पावसाचा जोर वाढल्याने पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. चिंचवडगावातील श्री मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरले. मंदिराचा अर्धा भाग पाण्यात बुडाला आहे. पवना धरण सुमारे 60 टक्के भरले असून धरणातून अजून कोणत्याही प्रकारे पाण्याचा विसर्ग सुरू झालेला नाही.
काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने हजेरी लावली आहे. रविवारपासून पाऊस पडत आहे. मावळात धुवांधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढे ओसांडून वाहू लागले आहेत. मावळात पावसाचा जोर वाढल्याने पवना नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. त्यामुळे चिंचवडगावातील श्री मोरया गोसावी मंदीरातही पाणी शिरले आहे. मंदिराचा अर्धा भाग पाण्या खाली बुडाला आहे.
काही ठिकाणी नदीच्या काठच्या नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. पिंपरीतील आंबेडकर कॉलनीतील खालच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे तेथील नागरिकांना बौद्ध विहारात स्थलांतरित केले. शहरातही पावसाचा जोर कायम आहे. शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. शहराच्या विविध भागात पाणीच पाणी झाले आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
सकाळपेक्षा सायंकाळी पाणी कमी आहे. नदीकाठी असलेल्या पिंपरीतील आंबेडकर कॉलनीतील खालच्या घरांना पाणी लागले होते. तेथील नागरिकांची बौद्ध विहारात व्यवस्था केली.