संदीप मोहोळ खून प्रकरणात तिघांना जन्मठेप १२ जणांची निर्दोष मुक्तता

0

पुणे : टोळी युध्दातून कुख्यात गुंड संदीप मोहोळ यांच्या खून प्रकरणात मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी तिघांना जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यातील १२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सचिन निवृत्ती पोटे, जमीर मेहबूब शेख, संतोष रामचंद्र लांडे यांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे.
मोहोळ याचा चार ऑक्टोबर २००६ रोजी पौड फाटा येथे गोळ्या घालून खून करण्यात आला होता.

या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने गणेश मारणे, सचिन पोटे आणि इतर अशा एकूण १८ जणांना अटक केली होती. त्यातील गणेश निवृत्ती मारणे, संजय महिपती कानगुडे, समीर मेहबूब शेख, सोपान सचिन मारणे, राहुल रामचंद्र तारू, अनिल वाघू खिलारे, विजय महिपती कानगुडे, शरद तुकाराम विटकर, नीलेश किसन माझीरे, राहील मेहबूब शेख, दत्तात्रेय धोंडीबा काळभोर, दीपक किसन मोकाशी या १२ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर पांडुरंग विठ्ठल मोहोळ, दिनेश खडकसिंग आवजी आणि इंद्रनील चंद्रभूषण मिश्री या तीन आरोपींचा खटला सुरू असताना मृत्यू झाला आहे.

 

मारणे टोळीतील अनिल मारणे याचा २००५ मध्ये टोळी युद्धातून संदीप मोहोळच्या टोळीतील गुंडांनी खून केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी २००६ साली संदीप मोहोळ याचा पौड रोड परिसरात खून करण्यात आला होता, असे पोलिस तपासातून स्पष्ट झाले होते.

 

सरकारी वकील म्हणून तत्कालीन जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वला पवार, ॲड. विलास पठारे यांनी काम पाहिले. तर आरोपींकडून अ‍ॅड. सुरेशचंद्र भोसले, ॲड. डॉ. चिन्मय भोसले, अ‍ॅड. सुधीर शहा, अ‍ॅड. हर्षद निंबाळकर, ॲड. एन. डी. पवार अ‍ॅड. ॲड. संदीप पासबोला, अ‍ॅड. राहुल वंजारी, अ‍ॅड. अतुल पाटील, अ‍ॅड. धैर्यशील पाटील, अ‍ॅड. जितेंद्र सावंत, अ‍ॅड.

Leave A Reply

Your email address will not be published.