पवनानगर : पवन मावळ परिसरात तीन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तुंग येथील भैरवनाथ मंदिरा शेजारची जागेला मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यातच पावसाचा जोर कायम असल्याने या भेगा वाढत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भैरवनाथनाथाचे मंदिर हे डोंगरावर असून याच्या पायथ्याला तुंग गावठाण आहे. त्यामुळे जर भूस्खलन झाले तर गावठाणाला मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होऊ शकतो तर जवळच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत आहे, त्याला देखील धोका निर्माण होऊ शकतो.
मागील दोन वर्षापूर्वी अशाच स्वरूपाचा भेगा याठिकाणी पडल्या होत्या त्यावेळी भूसर्वेक्षण अधिकारी यांनी पाहणी करून या भेगांमुळे काहीही नुकसान होणार नाही, ह्या भेगा उंच भाग असल्याने जमीनीत पाणी जाऊन पडतात अशी शक्यता वर्तवली होती. परंतु पुन्हा याच ठिकाणी भेगा पडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या डोंगराचा काही भाग सिताराम पाठारे यांच्या दुकानावर पडल्याने हे दुकान जमीनदोस्त झाले असून त्यांचे
पवनमावळ परिसरातील धरणाच्या आतील भागातील गावांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून पावसाचा जोर कायम असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल झालेल्या पावसामुळे जवण तुंग रस्त्याचा अनेक ठिकाणचा भाग वाहून गेला आहे. बोडशीळ फाट्यावरील रस्त्याचा काही भाग पावसाच्या प्रवाहाने वाहून गेला आहे. तर चावसर व तुंग भागातीलही अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे या परिसरातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी धोक्याचे बनले आहेत.
तुंग गावचे माजी सरपंच संदिप पाठारे म्हणाले, मागिल तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी मोठमोठ्या भेगा पडल्या असून तीन वर्षांपूर्वी अशीच घटना घडली होती. परंतु प्रशासनाने पाहणी करून कोणताही धोका नसल्याची माहिती दिली होती. परंतु प्रत्यक्षात आज परिस्थिती वेगळी आहे पावसाच्या पाण्याने भेगा मध्ये पाणी गेल्याने दुर्घटना होण्याची शक्यता आहे प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
तलाठी दगडे यांनी तुंग येथे सिताराम पाठारे यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला. याबाबतची माहिती वरिष्ठांना कळविले आहे तसेच सचिन घोटकुले स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने सिताराम पाठारे यांना आर्थिक मदत करण्यात आली तर भाजपाचे किरण राक्षे यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली.