पिंपरी : रेकी करून ज्वेलर्स शॉप आणि बँका फोडणाऱ्या नेपाळी टोळीला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली आहे. या आरोपींकडून 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बावधन येथे 18 जून रोजी एका ज्वेलर्सच्या दुकानात अशा प्रकारची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
जगत बम शाही (28, रा. क्रिस्टल पैलेस, क्रिष्णा कॉलनी, मारुंजी पुणे. मुळ रा. गाव गटाडा, विनायक नगरपालिका, जि. अच्छम, नेपाळ), गणेश विष्णु शाही (33, मूळ रा. गाव भुरुआ, लम्की टिकापुर रोड, जि. कैलासी, नेपाळ), खगेंद्र दोदी कामी (27, मूळ रा. घाटगाऊ चौगुने गाव पालिका जि. सुरखेत नेपाळ), प्रेम रामसिंग टमाटा (42, सध्या रा. पद्मालय पार्क, लंडन ब्रिज जवळ, पुनावळे, पुणे. मुळ रा. कालकांडा, विनायक नगरपालिका, जि. अच्छम, नेपाळ), रईस कादर खान (52, रा. तीन डोंगरी, प्रेम नगर, उन्नत नगर रोड क्र.2 साईबाबा मंदीर समोर, गोरेगाव (पश्चिम) मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
जगदंबा ज्वेलर्स, शॉप नं. 2, गीतांजली अपार्टमेंट, हुतात्मा चौक, बावधन बु. या शॉपच्या बाजूचे दुकान आरोपींनी 15 जून रोजी चायनीज व्यवसायासाठी भाड्याने घेतले. 18 जून रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ज्वेलर्स दुकानदाराने दुकान उघडले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी शेजारील चायनिज दुकानातून पोटमाळ्यावरील भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश करून गॅस कटरने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु तिजोरी न फुटल्याने दुकानातील वर ठेवलेले चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल फोन व सीसीटीही डीव्हीआर असा एकूण तीन लाख 55 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात आजूबाजूच्या परिसरात काम करणारे नेपाळी वॉचमन सामिल असण्याची दाट शक्यता पोलिसांना वाटली. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणात मारुंजी परिसरात वॉचमन म्हणून काम करणारा एक इसम सदर गुन्ह्यात सामिल असल्याबाबत संशय आल्याने तसेच तो घटना झाल्यापासून काम सोडून गेल्याचे कळाल्याने त्याच्यावरील संशय बळावला. त्याच्याबाबत माहिती काढून पोलिसांनी जगत बम शाही याला अंबरनाथ येथून 12 जुलै रोजी अटक केली. त्याने त्याच्या तीन साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी गणेश, खगेंद्र, प्रेम या तिघांना ठाणे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केली.
अटक केलेल्या आरोपींकडून एक किलो 719 ग्रॅम चांदीचे दागिने, 11 ग्रॅम सोन्याचे दागिने, इनोव्हा कार, दुचाकी, मोबाईल फोन असा एकूण 12 लाख तीन हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, सिद्धनाथ बाबर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धर्मराज आवटे, दादा पवार, नारायण जाधव, पोलीस अंमलदार प्रविण दळे, संजय गवारे, अदिनाथ मिसाळ, राहिदास आडे, संतोष असवले, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मो. गौस नदाफ, वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, प्रशांत सैद, तुषार काळे, अजिनाथ ओबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण, आणि तांत्रिक विश्लेषन विभाग (गुन्हे शाखा) चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, राजेंद्र शेटे, नागेश माळी, विकास आवटे, पोपट हुलगे यांनी केली आहे.