शहरात आज 63 केंद्रांवर मिळणार लस

0
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील लसीकरण सोमवारी (दि. 2) सुरू आहे. शहरातील 63 केंद्रांवर कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या लसीचे डोस मिळणार आहेत.
सोमवारी कोविशिल्ड या लसीचा वय 18 ते 44 या वयोगटातील लाभार्थींना आठ केंद्रांवर पहिला आणि दुसरा डोस मिळणार आहे. तसेच 18 ते 44 वर्ष वयोगटातील लाभार्थींना 27 केंद्रांवर कोविशिल्ड लसीचा पहिला डोस मिळणार आहे.
सोमवारी 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थींना आणि एच सी डब्ल्यू व एफ एल डब्ल्यू यांना कोविशिल्ड या लसीचा पहिला आणि दुसरा डोस 24 केंद्रांवर मिळणार आहे.
सोमवारी 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थींना कोव्हॅक्सीन लसीचा पहिला आणि दुसरा डोस स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल शिवतेज नगर या केंद्रावर मिळणार आहे. तर तीन केंद्रांवर 45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लाभार्थींना कोव्हॅक्सीन लसीचा पहिला आणि दुसरा डोस मिळणार आहे. यासाठी लसीकरण केंद्रांवर ऑन द स्पोर्ट रजिस्ट्रेशन इन कोवीन ॲप द्वारे नोंदणी करण्यात येईल.
शहरातील आठ केंद्रांवर सोमवारी गरोदर महिलांचे लसीकरण करण्यासाठी काही डोस शिल्लक ठेवण्यात आले आहेत. लसीकरण सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत करण्यात येईल. कोविड ॲपवर नोंदणी करण्यासाठी सोमवारी सकाळी आठ नंतर स्लॉट, बुकिंग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशनसाठी लसीकरण केंद्रांवर सोमवारी सकाळी नऊ वाजल्यानंतर टोकन वाटप करण्यात येईल. त्यामुळे वेळेपूर्वी नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.
Leave A Reply

Your email address will not be published.