केंद्राकडून राज्यातील 9 जिल्ह्याबाबत इशारा

0
नवी दिल्ली : कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. दुसरी लाट संपत असतानाच तिसऱ्या लाटेची भिती व्यक्त केली जात आहे. दुसरी लाट अद्याप संपलेली नसतानाच महाराष्ट्र आणि केरळसह  १० राज्यांतील ४६ जिल्ह्यांत संसर्गाचा दर १० टक्क्यांच्या पुढे गेल्याने आरोग्य यंत्रणा धास्तावली आहे. धोकादायक परिस्थिती पाहाता आयसीएमआरने देशातील 46 जिल्ह्यांना इशारा दिला असून निर्बंध अधिक कठोर करण्याच्या सूचना केल्या आहेत. या 46 जिल्ह्यांमध्ये राज्यातील 9 जिल्ह्यांचा समावेश आहे.
देशातील ४६ जिल्ह्यांत १० टक्क्यांपेक्षा जास्त व अन्य ५३ जिल्ह्यांत तो ५ ते १० टक्के आहे. वेगाने वाढणारी रुग्णसंख्या पाहता केरळने दोन दिवसांचा लॉकडाउन लागू केला आहे. महाराष्ट्रातील रूग्णसंख्या आटोक्यात आली नाही तर येथेही हीच वेळ येण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांनी चिंता वाढवली आहे…कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, अहमदनगर आणि बीडदहा राज्य कोणती?केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा, तमिळनाडू, आसाम, मिझोराम, मेघालय, आंध्र प्रदेश व मणिपूर
दहा राज्यांकडून केंद्राला सूचनारुग्णालये व तेथील सुविधा, ऑक्सिजन संयंत्रे व त्यांची देखभाल याबाबतची माहिती केंद्राकडे त्वरित कळवावी, असे सांगण्यात आले आहे. खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांट कार्यरत करण्याबाबत कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जे कोरोनाग्रस्त गृह विलगीकरणात आहेत, त्यांनी कोणत्याही स्थितीत घराबाहेर पडून लोकांमध्ये मिसळू नये, याकडे लक्ष देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आले आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.