आणखी एक कोयता भाई ‘गुंडा स्कॉड’च्या ताब्यात

0
पिंपरी : हातामध्ये कोयता तसेच इतर हत्यारे घेवून दहशत माजविणाऱ्यांवर पिंपरी चिंचवडच्या गुंडा विरोधी पथकाचे कारवाई सत्र सुरुच आहे. तोंडात कोयता पकडून त्याचे सोशल मिडियावर प्रदर्शन करणाऱ्या आणखी एका कोयताभाईला पोलिसांनी अटक केली आहे.
राज अवधूत शर्मा (18, रा. पांढारकर चाळ, दळवीनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुंडा विरोधी पथकातील कर्मचारी शुभम तानाजी कदम यांनी सोमवारी (दि. 2) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शर्मा यांने कोयता तोंडात पकडलेला फोटो सोशल मीडियावर टाकला होता. याबाबतची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला सोमवारी (दि. 2) रात्री सात वाजताच्या सुमारास दळवीनगर, चिंचवड परिसरातून अटक केली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.