पिंपरीत आढळला ब्रिटिश कालीन ‘बॉम्ब’

0
पिंपरी : पिंपरीमध्ये ब्रिटिशकालीन ‘बॉम्ब’ सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज (सोमवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपरीत उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बॉम्ब सदृष्य वस्तू आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.
पिंपरी येथील क्रोमा सेंटर जवळ बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली आहे. क्रोमाच्या पाठीमागे असलेल्या कोहिनूर सोसायटीमध्ये गार्डनमध्ये खोदाईचे काम सुरु आहे. खोदाई करत असताना मजुरांना बॉम्ब सदृष्य वस्तू आढळून आली. याची माहिती पिंपरी पोलिसांनी मिळताच पिंपरी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले.
सध्या या ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) दाखल झाले आहे. पथकाकडून बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरु केले. हा बॉम्ब ब्रिटीशकालीन असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सागर कवडे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात नागरिकांना येण्यास मनाई केल्याचे सांगण्यात आले होते.
Leave A Reply

Your email address will not be published.