व्यावसायिकास जीवे मारण्याची धमक्या देत उकळली दरमहा दहा लाखांची खंडणी

इंडसच्या सहा अधिका-‍यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

0
पुणे : डिझेलच्या वापराबाबतची नऊ कोटी रुपयांची थकबाकीचे दोन कोटींमध्ये तडजोड करत व्यावसायिकास जीवे मारण्याच्या धमकी दिल्या प्रकरणी इंडस टॉवर्स प्रा. लि. कंपनीमधील सहा जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.
सुनील मनोहर मानकर, संदीप ईश्वरचंद गौबा, राजेश महेशचंद्र बन्सल, तन्वीर सिंग प्रेमप्रकाश सरोहा, दिनेश एल अरोरा, अजय कुमार अरोरा अशी आरोपींची नावे आहे. सर्व आरोपी इंडस कंपनीचे पदाधिकारी आहेत. याबाबत मुंढवा येथील ३९ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. ऑगस्ट २०१७ ते २२ जानेवारी २०२१ दरम्यान राज्यभरात विविध ठिकाणी हा प्रकार घडला. फिर्यादी यांच्या कंपनीची आरोपी कार्यरत असलेल्या इंडस टॉवर कंपनीकडे डिझेल पुरवठ्याची नऊ कोटी रुपयांची थकबाकी होती.
 त्याबदल्यात आरोपींनी दोन कोटी रुपयांमध्ये तडजोड केली. त्यानंतर फिर्यादींना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तडजोडीवर बळजबरीने सह्या घेत पुढील तीन वर्षे काम कसे करावे, यांची अंडरटेकिंग घेऊन नंतर टर्मिनेशन नोटीस देवून दिशाभूल केली. तसेच कंपनीचे काम मिळण्यासाठी ऑगस्ट २०१७ पासून डिसेंबर २०२० पर्यंत दर महिन्याला १० लाख रुपये खंडणी घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी बचाव पक्षाच्यावतीने अर्ज करण्यात आला. त्यास विशेष सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी विरोध केला. यापूर्वी अंतरिम जामीन मंजूर केलेला असताना तपासासाठी ते पोलिसांकडे हजर राहिले नसल्याने त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. फिर्यादी दरमहा १५ लाख रुपयांची खंडणी देत नसल्याने कंपनीकडून दिल्या जाणा-‍या डिझेलमध्ये ऑक्टोंबर २०१९ पासून कपात केली. त्यामुळे, फिर्यादी यांनी स्वत:कडील 9 कोटी रुपये डिझेलवर खर्च करून कंपनीच्या साइट सुरू ठेवल्या, असे अ‍ॅड. कावेडिया यांनी न्यायालयास सांगितले केली.
Leave A Reply

Your email address will not be published.