पुणे : सह्याद्री प्रतिष्ठान, हिंदुस्तान मुळशी तालुका दुर्गसेविका यांच्या वतीने आसाम सिमेवर तैनात असलेल्या जवानांना राख्या पाठविण्ण्यात आला. शिवतेज गणेश मंदिर, हिंजवडी येथे हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंजवडी ग्रामपंचायत सरपंच विक्रम साखरे, सदस्य विशाल साखरे, सामाजिक कार्यकर्ते विश्वासआप्पा जांभुळकर, अमित जांभुळकर, सचिन जांभुळकर, किरण जांभुळकर तसेच मीनाक्षी शिरीषकुमार भिसे (कारगिल युद्ध शहीद. पॅरा स्पेशल कमांडो, स्नाइपर शूटर, नायक शिरीष कुमार भिसे यांच्या वीर पत्नी), कमांडो सुभेदार नंदकुमार घोरपडे (२१ पॅराशुट स्पेशल फॉर्स), कमांडो रमेश पाटील. (२१ पॅराशुट स्पेशल फॉर्स), शुभांगी सरोते. प्रदेशाध्यक्ष वेटरनस इंडिया महाराष्ट्र,।भोलानाथ सिंह ननवग (राष्ट्रीय सचिव व अध्यक्ष वेटरनस इंडिया महाराष्ट्र.), स्मिता माने. राष्ट्रीय सैनिक संस्था, योगेन्द्र कौशिक (वाईस प्रेसिडेन्ट) वेटरनस इंडिया.महाराष्ट्र, रमेश वराडे. माजी सैनिक आणि सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेविका दुर्गसेवक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी श्रुती अजय भोईर यांनी तर आभार प्रदर्शन दत्ता मामा कुंजीर यांनी केले. संयोजन, नियोजन आणि विशेष सहकार्य प्रतापराव भोसले यांनी केले.