डीएसकेंच्या पत्नीला उच्च न्यायालयाचा दिलासा

हेमंती कुलकर्णी यांना जामीन मंजूर

0

पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना मुंबर्इ उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. नार्इक यांनी हा निकाल दिला.
डीएसके आणि हेमंती कुलकर्णी यांचा जामीन अर्ज यापुर्वी ३० नोव्हेंबर २०१९ साली येथील सत्र न्यायालयाने फेटाळला होता.
दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर डीएसके, त्यांची पत्नी हेमंती आणि सई वांजपे यांनी जामीन मिळावा म्हणून कोर्टात अर्ज दाखल केला होता. डीएसके यांनी १८४ कोटी रुपये आपल्या नातेवाइकांच्या खात्यावर वळविले. प्रकल्पासाठी बँकेकडून कर्ज घेऊन ते पैसे इतरत्र वळविण्यात आले. डीएसके यांना आर्थिक नियोजन न करता आल्याने त्यांच्यावर कर्ज झाल्याच्या युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केला होता.
डीएसके यांचे बंधू मकरंद कुलकर्णी यांच्यासह काहींना या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर डीएसके दांपत्यांचा जामीन नाकारण्यात आला होता. जामीन मिळण्यासाठी हेंमती कुलकर्णी यांनी आशुतोष श्रीवास्तव यांच्यावतीने अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने हेमंती यांचा जामीन नोव्हेंबर २०१९ साली फेटाळला होता. हेंमती या गेल्या साडेतीनवर्षांपासून तुरुंगात आहे. त्यांना शिक्षा झाल्यास त्यास असलेल्या तरतुदीनुसार त्यांनी अर्धी शिक्षा भोगली आहे. त्यांचे वय आणि कोरोना स्थितीचा विचार करता हेंमती यांना जामीन देण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. श्रीवास्तव यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.