बेरोजगार झालेल्यांना मिळणार रोजगाराची संधी

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने घेतला पुढाकर

0

पुणे : कोरोनाच्या पहिल्या व दुसर-या लाटेचा अनेकांना रोजगार गमवावा लागला. तर काहींना कोरोनाला घाबरून पुणे सोडले. यामुळे शहरातील अनेक क्षेत्रात संध्या कुशल आणि अकुशल कामागारांची कमतरात निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पुढाकर घेतला आहे.

 

‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरण’, ‘सिम्बायोसिस लॉ कॉलेज’, ‘डिवार्इन जैन ग्रुप ट्रस्ट’ आणि ‘ललिता मोतीलाल सांकला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ज्यात औद्योगिक, बांधकाम, हाऊसकिपींग आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यासाठी त्यात रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी माहिती प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश संजय ए. देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत, सिम्बायोसिस लॉ कॉलेजच्या संचालिका डॉ. शशिकला गुरपूर, ललिता मोतीलाल सांकला फाउंडेशनचे अध्यक्ष सनील सांकला आणि डिवार्इन जैन ग्रुप ट्रस्टचे अध्यक्ष संकेत शहा यावेळी उपस्थित होते.

 

कामगारांनी न्यायालयात अर्ज केल्यानंतर त्यांची तटताळणी केली जार्इल. त्यानंतर कामगारांचे अर्ज संबंधित कंपन्यांना पाठविण्यात येणार आहे. अर्जदाराला कोणत्या कामात रस आणि माहिती आहे, त्यानुसार त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येर्इल. नऊ सप्टेंबरपर्यंत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पहिला मजला, नवीन इमारत, जिल्हा न्यायालय, शिवाजीनगर आणि [email protected] येथे अर्ज करावेत, असे सचीव सावंत यांनी सांगितले.

 

मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध :
चाकणसह परिसरात सध्या नवीन उद्योग सुरू होत आहेत. तर सध्या सुरु असलेल्या उद्योगांकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे उत्पादन कमी झाले आहे. या आद्योगिक वसाहतीमध्ये मोठा प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे. त्याचा गरजुंनी लाभ घ्यायला हवा, असे शहा आणि सांकला यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.