धक्कादायक….14 वर्षीय मुलीवर तीन अल्पवयीन मुलांकडून सामूहिक लैंगिक अत्याचार

0

पिंपरी : पुणे शहरात एका तरुणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ताजी असताना पिंपरी चिंचवड शहरात एक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर तीन अल्पवयीन मुलांनी वारंवार सामूहिक लैंगिक अत्याचार केले. तसेच त्याचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. ही धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड परिसरात घडली आहे.

याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना जून 2020 ते 24 ऑगस्ट 2021 या कालावधीत चिंचवड येथे घडली.

आरोपी पीडित 14 वर्षीय मुलीला तुझ्या घरच्यांना मारून टाकेल. तसेच तुझा अश्‍लिल व्हिडिओ व्हायरल करेल, अशी धमकी देऊन आरोपी राहत असलेल्या घराजवळ तसेच एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

यापैकी एका अल्पवयीन मुलावर चार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर दुसऱ्या अल्पवयीन मुलावर एक गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांपैकी दोघांवर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, दरोडा, वाहन चोरी यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.