दोन सॅमसंग गुरूचे मोबार्इल, एअरटेल, व्होडाफोन, आयडीयाचे प्रत्येकी एक सीम कारागृहात पोहच कर
येरवडा कारागृहात असलेल्या आरोपी भावाची बहिणीला सांकेतिक भाषेत चिठ्ठी
पुणे,: उसने दिलेल्या पैशांवर मानहानी व्याज आकारत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येरवडा कारागृहात रवानगी झालेल्या आरोपीने त्याचा बहिणीला सांकेतिक भाषेत चिठ्ठी लिहिली. दोन सॅमसंग गुरूचे मोबार्इल, एअरटेल, व्होडाफोन, आयडीयाचे प्रत्येकी एक सीम कारागृहात पोहच कर, अशा सूचना तिला देण्यात आल्या असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणात सागर कल्याण राजपूत (वय ३४, रा. शास्त्रीनगर, कोथरूड. मुळ रा. कल्प डिझायनर गोत्री, वडोदरा, गुजरात) आणि राणी सागर मारणे (वय २७, रा. कोथरूड) यांनी अटक करण्यात आली आहे. सागर हा सध्या येरवडा कारागृहात आहे. तर राणी हिला अटक करून तिची देखील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
राणी हिला अटक होण्यापूर्वी सागरने तिला सांकेतिक भाषेत चिठ्ठी पाठवली होती. या चिठ्ठ्या पोलिसांनी तपासादरम्यान जप्त केल्या आहे. दरम्यान राणी हिने जामिनासाठी अर्ज केला होता. त्यास सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी विरोधात केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी तिचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
जामीन विरोध करताना ॲड. मुरळीकर यांनी युक्तिवाद केला की, राणी हिने सागर याची पत्नी जिग्नेशा राजपुत यांनी मिळून फिर्यादी यांना धमकावून त्यांच्याकडून जुलैअखेरपर्यंत चार लाख ४५ हजार रुपये घेतले आहे. सागर याने सांकेतिक भाषेत चिठ्ठी लिहून त्यांच्या साथीदारांना पैसे कसे वसूल करायचे याबाबत सूचना दिलेल्या आहेत. राणी ही कोणाच्या मदतीने सागर यास कारागृहात चिठ्ठी पाठवत याचा तपास करायाच आहे. त्यामुळे तिला जामीन फेटाळण्यात यावा.