चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ”आज एक-एक वॉर्डची रचना होणार आहे. उद्या जे ठरेल, त्यामध्ये दोनचे ठरले तर, एक आणि दोन वॉर्ड जवळ येतील. पूर्वी एकदा तीन सदस्यीय तर मागची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने लढविली होती. आगामी निवडणुकांबाबत आत्तापर्यंत राज्य सरकारने अंतिम निर्णय घेतलेला नाही. राज्य सरकारमधील तीन पक्ष मिळून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन काय तो निर्णय घेतला जाईल”.
”ओबीसी आरक्षणाबाबत आज होणा-या मिटिंगमध्ये चर्चा होईल. त्यानंतर कॅबिनेट समोर येईल. परंतु, पहिल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या झालेल्या बैठकीत जोपर्यंत मार्ग निघत नाही. तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नयेत अशी चर्चा झाली होती. पण, काही करुन मार्ग काढायचा असा आमचा कटाक्षाने प्रयत्न आहे. ओबीसींवर अन्याय होऊ द्यायचा नाही. ही महाविकास आघाडी सरकारची भूमिका असल्याचेही” पवार यांनी सांगितले.