दाऊद हस्तकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा; मुंबई पोलीस

0

मुंबई : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी सहा अतिरेक्यांना अटक केली. यामध्ये जान मोहम्मद शेख नावाच्या व्यक्तीचा सुद्धा समावेश होता. जान मोहम्मद शेख हा मुंबईच्या धारावी येथील सोशलनगर मध्ये राहणारा आहे. इतकंच नाही तर जान मोहम्मद हा दाऊदचा छोटा भाऊ अनिस इब्राहिमच्या संपर्कात होता आणि अनिसने स्फोटकं घेण्यासाठी हवालाच्या माध्यमाने जान मोहम्मदला पैसे सुद्धा पाठवले होते. त्यामुळे मुंबईमध्ये दाऊदचे हस्तक अजूनही सक्रिय असल्याने पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आता दाऊदच्या जुन्या साथीदारांवर लक्ष ठेवण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत.मुंबईमध्ये घडवण्यात आलेल्या 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद होता. मुंबईमधील दाऊदच्या हस्तकांनी त्याला ते बॉम्बस्फोट घडवून आणण्यात मदत केली होती. त्यामुळे त्यांचा पुन्हा वापर करून मुंबईला पुन्हा हादरा बसेल अस कृत्य दाऊद करू शकतो आणि म्हणूनच त्या हस्तकांवर पाळत ठेवणं, ते कुठे राहतात? काय करत आहेत? जर एखाद्याने त्याचा पत्ता बदला आहे तर तो कुठे राहतो या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहे.

दहशतवाद्यांचा घातपाताचा कट उधळल्यानंतर मुंबई ‘हायअलर्ट’वर; मुंबई लोकलच्या सुरक्षेसाठी नवं मॉडल उभारणार दहशतवाद्यांचा घातपाताचा कट उधळल्यानंतर मुंबई ‘हायअलर्ट’वर; मुंबई लोकलच्या सुरक्षेसाठी नवं मॉडल उभारणार जान मोहम्मदला दिल्लीतील विशेष पथकाने अटक केल्यानंतर मुंबईतील तपास यंत्रणा सक्रिय झाल्या. इतकंच नाही तर मुंबई गुन्हे शाखेच पथक सर्वात आधी जान मोहम्मदच्या धारावी येथील घरी पोहोचले आणि त्याच्या घराची झाडाझडती सुरू करून त्याच्या घरच्यांची चौकशी केली. यानंतर त्यांना चौकशीसाठी धारावी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे.1993 मधील प्रकरणातील आरोपी होते, जे आपली शिक्षा पूर्ण करून बाहेर आले आहे त्यांच्यावर सुद्धा मुंबई पोलीस पाळीत ठेवून असणार आहे. एकेकाळी मुंबईमध्ये दाऊदच मोठं नेटवर्क होत, मात्र कालांतराने त्यात मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळाली.

हल्लीची घटना पाहता आपल्या जुन्या नेटवर्कपैकी किंवा नवीन तयार करण्यात आलेल्या हस्तकांचा वापर करून दाऊद पुन्हा एकदा काहीतरी कट-कारस्थान रचत असल्याचं समोर आलं आहे. सुदैवाने या बदहशतवाद्यांकडून आखण्यात आलेला प्लॅन दिल्ली स्पेशल सेलने उधळून लावला. मात्र भविष्यात पुन्हा अशाच प्रकारचं कट-कारस्थान दाऊद किंवा त्याच्या हस्तकांकडून घडवण्यात येऊ शकतं. त्यामुळे मुंबईमध्ये दाऊदच्या हस्तकांचा नायनाट करण्याचा ध्यास मुंबई पोलिसांनी घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.