राज्यातील सिनेमा हॉल, थिएटर्स 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार

0

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर राज्यातील सर्व थिएटर्स बंद करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारकडून निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. त्यानुसार राज्यातील थिएटर्स आता पुन्हा सुरु होणार आहेत. 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून राज्यातील थिएटर्स पुन्हा खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे.

यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरु असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल. आज टास्क फोर्स सदस्य खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली.

Theatres and auditoriums in Maharashtra will open after 22nd October 2021 while observing all COVID safety protocols. SOP is in the works and will be declared soon.

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 25, 2021

येत्या 5 नोव्हेंबर रोजी जागतिक मराठी रंगभूमी दिन साजरा केला जात आहे. अनलॉक नंतर अनेक कलाकारांनी नाट्यगृह पुन्हा सुरु करण्याची मागणी केली होती. परंतु, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे शक्यता धुसर होती. पण, आता राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता सुद्धा कमी झाली आहे. त्यामुळे 5 नोव्हेंबरला नाट्यगृह सुरु केले जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.