मुंबई : डायग्नोस्टिक चेन विजया डायग्नोस्टिक सेंटरने आपल्या इनिशियल पब्लिक ऑफरसाठी (IPO) प्राईस बँड निश्चित केला आहे. त्यासाठी कंपनीने प्रति शेअर 522-531 रुपये प्राईस बँड (Price Band) निश्चित केला आहे. या माध्यमातून 1895 कोटी जमा करण्याची योजना आहे. विजया डायग्नोस्टिक आयपीओ पुढच्या आठवड्यात 1 सप्टेंबरला सुरू होईल. 3 सप्टेंबरपर्यंत त्यात गुंतवणूक केली जाऊ शकते. हा आयपीओ ऑफर फॉर सेल (OFS) आहे ज्यात प्रवर्तक (Promotors) आणि गुंतवणूकदार त्यांचा हिस्सा कमी करतील. तुम्ही या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर आधी संपूर्ण तपशील जाणून घ्या.
पुर्णतः ऑफर फॉर सेल (OFS)विजया डायग्नोस्टिकचे फ्रेश इक्विटी शेअर्स जाहीर केले जाणार नाहीत. हे पुर्णतः ओएफएस असतील, ज्यात 3,56,88,064 इक्विटी शेअर्स विकले जातील. आयपीओचे प्रवर्तक (Promoter) एस सुरेंद्रनाथ रेड्डी आणि गुंतवणूकदार काराकोरम लिमिटेड आणि केदारा कॅपिटल अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड यांच्या वतीने 35 टक्के हिस्सा विकला जाईल. डॉ. एस. सुरेंद्रनाथ रेड्डी 50.95 लाख शेअर्स आणि काराकोरम लिमिटेड 2.94 कोटी इक्विटी शेअर्स विकतील. तर केदारा कॅपिटल अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड-केदारा कॅपिटल एआयएफ 1 द्वारे 11.02 लाख शेअर्स विकतील.
कोणासाठी किती शेअर्स राखीवआयपीओचा 50 टक्के भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (Qualified Institution buyers) आणि 35 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव (Retail Investors) ठेवण्यात आला आहे. उर्वरित 15 टक्के संस्थात्मक नसलेल्या खरेदीदारांसाठी (Non Institutional Buyers) राखीव असेल. 1.5 दशलक्ष इक्विटी शेअर्स कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीज (ICICI Securities), आयडलवाइज फायनान्शियल सर्व्हिसेस आणि कोटक महिंद्रा कॅपिटल यांची आयपीओसाठी गुंतवणूक बँकर्स म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.