पिंपरी : मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर रेल्वेचा अपघात झाल्याची घटना लोणावळा रेल्वे स्थानकावर आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. इंदोर-दौंड एक्सप्रेसचे दोन डब्बे लोणावळा रेल्वे स्थानकावर घसरले. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
इंदोर-दौंड एक्सप्रेस आज सकाळी आठ वाजता दौंडा रेल्वे स्थानकावर प्रवेश करत असताना गाडीचे दोन डब्बे रेल्वे रुळावरून खाली घसरले. त्यामुळे मुंबई-पुणे दरम्यानची सर्व वाहतून काही काळासाठी विस्कळीत झाली आहे. सध्या डब्बे रुळावर आणण्याचे काम रेल्वेकडून युद्धपातळीवर सुरू आहे. त्यानंतर सर्व वाहतूक सुरळीत होईल.
मागच्या इंजिनचा वेग वाढल्यामुळे अपघात झाल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप अधिकृत माहिती रेल्वे प्रशासनाकडून आलेली आहे. रेल्वे प्रशासनासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.