नवी दिल्ली : फ्रेशर्ससाठी आय टी क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध होत आहे. प्रसिद्ध आय टी कंपनी इन्फोसिस मध्ये फ्रेशर्सना नोकरी संधी देण्यात येणार आहे. विविध पदांसाठी ही भरती असणार आहे. २०१९ ते २०२१ बॅचच्या फ्रेशर्ससाठी ही भरती असणार आहे. बी.कॉम किंवा बी. इ. पर्यंत शिक्षण झालेल्याना तसेच आय टी क्षेत्रातील ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना ही नोकरीची संधी मिळणार आहे.
इन्फोसिस मध्ये प्रक्रिया कार्यकारी या पदांसाठी भरती होणार आहे. फ्रेशर्सना ही संधी मिळवण्यासाठी काही स्कील असणे आवश्यक आहे. उमेदवारांना उत्तम कम्युनिकेशन स्किलसह उत्तम लिखाणही करता येणं आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना टेक्नॉलॉजीचे उत्तम ज्ञान असणेही आवश्यक आहे.
पदवीधर फ्रेशर्ससाठी ही नोकरीची संधी असणार आहे. बॅचलर्स ऑफ कम्प्युटर सायन्स किंवा बॅचलर्स ऑफ इंजिनिअर आणि आय टी क्षेत्राशी निगडित काही कोर्सेस केले असतील तर ही नोकरीची संधी मिळणार आहे. तसेचच या जॉबसाठी कोईम्बतूर हे लोकेशन आहे.
या पदासाठी कोणत्याही शाखेतून बी.इ ची पदवी पूर्ण असलेल्या उमेदवारांसाठी ही नोकरी असणार आहे. यासाठी उमेदवारांकडे कस्टमर सर्व्हिसचे गुण असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे विश्लेषणात्मक स्किल्स आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स असणे आवश्यक आहे.