सासवड : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूकदाराना असणाऱ्या संधी योग्य प्रकारे कोणत्या पद्धतीने पदरात पाडून घ्यायच्या याबाबत रविवारी सासवड येथे रुची शेअर मार्केट इन्स्टिट्यूटच्या वतीने मोफत सेमिनार घेण्यात आले. सासवड मध्ये अश्या प्रकारे झालेल्या शेअर मार्केटच्या पहिल्याच सेमिनार नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
रुची शेअर मार्केट इन्स्टिट्यूटचे ‘चॅनेल पाटर्नर’ चंद्रशेखर वडणे यांनी या सेमिनारचे नियोजन केले होते. सध्या समाजात शेअर मार्केट मध्ये अनेक तर्क वितर्क काढले जात आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊन नंतर शेअर मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढलेली आहे. अनेक जण अद्यापही याकडे चुकीच्या पद्धतीने पाहत आहेत.
शेअर मार्केट वरील चर्चा यावर रुची शेअर मार्केटचे डायरेक्टर दत्तात्रय विभूते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या शंका दूर केल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे अपुरे ज्ञान किती धोकादायक असते हे समजावून सांगितले. या क्षेत्रात गुंतवणूक करायची असेल तर सर्व प्रथम योग्य शिक्षण घ्या आणि त्यानंतरच गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
सेमिनारच्याहॉल साठी शिवाजी राजिवडे यांचे सहकार्य लाभले. शैलेंश तांदळे युवा मोर्चा प्रदेश सचिव सौ.संध्याताई लोणकर, मनोज लांडगे, संदेश गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.