धक्कादायक….पतीनेच लावला पत्नीच्या बेडरुम मध्ये कॅमेरा; ‘ही’ बाब आली समोर

0

पिंपरी : पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू वसाहत असणाऱ्या वाकड परिसरात ‘बेडरुम’वर सीसीटीव्ही कॅमेरा लावून नजर ठेवल्याची घटना समोर आली. ही घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीवर घरातील कोणीतरी जबरदस्ती करत असल्याचा संशय आल्याने पतीनेच पत्नीच्या बेडरुम मध्ये कॅमेरा लावला. यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली असून नंदवा पत्नीवर जबरदस्ती करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.  ही घटना जुलै 2018 ते ॲागस्ट 2021 दरम्यान टेल्को कपुर सोसायटी, सेक्टर नं 24 , प्राधीकरण निगडी येथे घडली आहे.

या प्रकरणी पिडीत 28 वर्षिय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पती, सासरे, नंदावा आणि दोन महिला विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या सासरच्या मंडळींनी  फ्लॅट घेण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी करून  शारिरीक व मानसिक ञास दिला. आपल्या पतीला कोणीतरी त्रास देत असल्याचा संशय आला. त्यामुळे पतीने बेडरूम मध्ये कॅमेरे लावले आणि चिञिकरण केले. यामध्ये नंदावा याने पत्नीवर जबरदस्तीने संभोग केल्याचे समोर आले. तसेच नंदावा  आणि महिलांनी संमतीशिवाय गर्भपात केला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.  तपास पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.