हदयविकाराच्या झटका आलेल्या रूग्णांना मदत करण्यासाठी रूग्णवाहिकेच्या मॉंक ड्रिकचं आयोजन

पुण्यातील लोकमान्य रूग्णालयाचा अनोखा उपक्रम

0

पुणे : हृदयविकाराचा झटका आलेल्या रूग्णांना गोल्डन अवर मध्ये तातडीने वैदयकीय उपचार मिळणे अत्यंत गरजेचं असते. परंतु, शहरातील वाहतूक कोंडीमुळे बऱ्याचदा रूग्णवाहिकेला रूग्णालयात पोहोचण्यास विलंब लागतो. वेळीच उपचार न मिळाल्याने रूग्ण दगावण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन पुण्यातील लोकमान्य रूग्णालयाने हृदयविकाराचा झटका आलेल्या रूग्णांना गोल्डन अवर मध्ये उपचार मिळावेत, यासाठी रूग्णवाहिका मॉक ड्रिल ड्राइव्ह सुद्धा आयोजित करण्यात आले होते. याशिवाय हृदयविकाराच्या रूग्णांना अत्याधुनिका पद्धतीने उपचार मिळावेत, या अनुषंगाने पुण्यातील लोकमान्य रूग्णालयात स्वतंत्र कॅथलॅब सुरू करण्यात आली आहे. या विभागाद्वारे आता रूग्णांना अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या कँथलॅबच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री गिरीश बापट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आपत्कालीन स्थितीतील रूग्णांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी लोकमान्य रूग्णालयानं पाच रूग्णवाहिकेचे पाषाण, शिवाजी नगर, स्वारगेट, कोथरूड आणि औंध या भागात सात दिवसांसाठी मॉक ड्रिक ड्राइव्ह घेण्यात आले होते.

हृदयविकार किंवा स्ट्रोकचा झटका आलेल्या रूग्णांसाठी पहिली ६० मिनिटांचा काळ खूप महत्त्वाचा असतो. परंतु, शहरातील वाहतूक, रस्त्याच्या कडेला सुरू असलेली बांधकामे आणि रहदारी यामुळे ट्रॉफिकमधून वाट काढत रूग्णालयातपर्य़ंत पोहोचायला लागणारे ३० मिनिटांचे अंतर कापायला सुद्धा  रूग्णवाहिका चालकाला तारेवरची कसरत करावी लागते. बऱ्याचदा वाहतूक गर्दीमुळे रूग्णालयात पोहोचायला विलंब लागल्याने रूग्णाचा मृत्यू होण्याचीही दाट शक्यता असते. हे विचारात घेऊन रूग्णवाहिका लवकरात लवकर कशी रूग्णालयात पोहचू शकेल, यासाठी रूग्णवाहिका मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आले होते.

लोकमान्य रूग्णालयातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नितीन पत्की म्हणाले की, “सुमारे ८०% लोकांना घरातच हृदयविकाराचा झटका येतो. अशा स्थितीत रूग्णाला ६० मिनिटांत वैद्यकीय सुविधा मिळाल्यास किमान ५० टक्के हृदयविकारामुळे होणारे मृत्यू टाळता येऊ शकतात. म्हणून छातीत किंवा पाठीत दुखणं, धडधडणे, मान, पोट, दात किंवा जबडा दुखत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण वेळीच निदान व उपचार मिळाल्यास रूग्णाचे प्राण वाचवणे डॉक्टरांना शक्य होते.”

लोकमान्य रूग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेंद्र वैदय म्हणाले की, ” वाहन चालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही राबवत असलेल्या उपक्रमांपैकी एक म्हणजे अॅम्ब्युलन्स मॉक ड्रिल ड्राइव्ह. या मोहिमेद्वारे रूग्णवाहिकेला गर्दीतून जाण्यासाठी वाट मोकळी करून द्या, असे आवाहन अन्य वाहन चालकांना करण्यात येत आहे. जेणेकरून रूग्णवाहिका लवकरच रूग्णालयात पोहोचल्यास रूग्णावर तातडीने उपचार होऊ शकतील. यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.”

मंत्री गिरीश बापट म्हणाले की,  “आपत्कालीन परिस्थितीत आलेल्या गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार देण्यासाठी लोकमान्य हॉस्पिटलने घेतलेला हा एक अनोखा उपक्रम आहे. हदयविकाराचा झटका आलेल्या रूग्णांसाठी प्रत्येक मिनिटं महत्त्वाचा असतो. यासाठी रूग्णालयाद्वारे सुरू करण्यात आलेली रुग्णवाहिका मॉक ड्रिल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यास मदत करेल. सायरनचा आवाज ऐकल्यानंतर, रूग्णाचे प्राण वाचविण्यासाठी रूग्णवाहिकेला त्वरीत मार्ग मोकळा करून दिला पाहिजे. यासाठी सर्वांनी मिळून काम करणं गरजेचं आहे. या रूग्णालयाने अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून रूग्णांची सेवा करून नावलैंकिक मिळवले आहे. कोविडच्या काळातही या रूग्णालयाने खूप चांगले काम केले आहे. कोविड व कोविड नसलेल्या रुग्णांसाठीही उत्तम वैद्यकीय सेवा दिली आहे.  भविष्यातही या रूग्णालयाद्वारे चांगले समाजकार्य घडावेत, यासाठी या रूग्णालयाला मी सर्वातपरीने सहकार्य करेल.”

रूग्णांवर उपचार करण्यासाठी हृदयविकार तज्ज्ञ डॉ. प्रसाद शहा, डॉ. अमित शिनकर, डॉ. विवेक गायकवाड, डॉ. आशिष त्रिवेदी, डॉ. वरूण निवर्गी आणि इंटरव्हेंन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. यादव मुंढे या डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. याशिवाय प्रशिक्षित परिचारिका आणि सहाय्यक कर्मचारी सुद्धा रूग्णांची देखभाल करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.