लोणावळा : टपरी, पथारी, हातगाडी पंचायत वतिने २००८ साली लोणावळा येथील अतिक्रमण कारवाई विरोधात पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली, टपरी पथारी, हातगाडी धारकांसाठी मोठा लढा उभा केला. त्याचे फळ म्हणून नगरपालिकेमध्ये फेरीवाला कायदा स्थापन करण्यात आला. या कायद्याला दहा वर्षे पूर्ण होत असून आतापर्यंत नगरपालिकेने साधा सर्वे सुद्धा केलेला नाही, शहरातील एकाही टपरी, पथारी हातगाडी धारकांचे पुनर्वसन झालेले नाही. पुढील काळामध्ये तातडीने लोणावळा येथील सर्व टपरी, पथारी, हातगाडी धारकांच सर्वे करून हॉकर्स झोन राबून त्यांचे पक्यागाळ्यामध्ये मध्ये पुनर्वसन करण्यात यावे. त्यांना पक्के गाळे मिळावे, लायसन्स मिळावेत, पीएम योजना अंतर्गत जाने दहा हजार रुपये कर्ज परत केले त्यांना वीस हजार रुपये कर्ज देण्यात यावे, तसेच उद्योगासाठी दोन लाख रुपयांचे कर्ज तातडीने देण्यात यावे, रिक्षा चालक फेरीवाले घरकाम महिला यांना प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योगासाठी अर्थसाह्य करावे अशी मागणी, टपरी पथारी हातगाडी पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले,
टपरी पथारी हातगाडी पंचायत वतीने पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच लोणावळा मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांची भेट घेऊन त्यांच्या सोबत चर्चा केली,
यावेळी टपरी, पथारी पंचायत मावळ तालुका अध्यक्ष गणेश चव्हाण, लोणावळा शहर अध्यक्ष वसंत काळोखे ,उपाध्यक्ष आनंद पुजारी महाराष्ट्र, रिक्षा पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष बाबूभाई शेख,
शहर अध्यक्ष आनंद सदावर्ते राज्य संघटक, हाजी अब्बास खान, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जांभुळकर, कष्टकरी जनता आघाडी महिला अध्यक्षा अनिताताई सावळे, घरकाम महिला सभा अध्यक्षा आशाताई कांबळे, यावेळी उपस्थित होते,
लोणावळा शहर येथे २००८ साली मोठ्या प्रमाणामध्ये टपरी, पथारी, हातगाडी धारकांवर अतिक्रमण कारवाई करून त्यांना विस्थापित करण्यात आले.
अन्यायकारक कारवाई विरोधामध्ये टपरी हातगाडी धारकांनी तीव्र लढा उभा करून प्राणपणाने लढा दिला सर्वांच्या एकजुटीमुळे आंदोलनाला यश आले आणि लोणावळा नगरपालिकेने फेरीवाला उपजीविका अधिनियम प्रमाणे फेरीवाला कायदा स्थापन केला ,
परंतु या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी अजूनही झाली नसून साधा सर्वे देखील सुरू झालेला नाही , कायद्याप्रमाणे यामध्ये टपरी, पथारी हातगाडी धारकांचा जागेवर जाऊन ऑनलाइन सर्व्हे करणे,सर्वे नंतर सर्वां लाभार्थ्यांची संख्या जाहीर करणे सर्वांना लायसन्स देणे ज्यांना लायसन दिले त्यांचे पक्या गाड्यांमध्ये मध्ये पुनर्वसन करणे, हॉकर्स झोन राबवणे, अशा प्रकारचे नियोजन नगरपालिकांनी करणे आवश्यक आहे,
” महाराष्ट्र मध्ये बहुतेक महानगरपालिकेत आणि नगरपालिकेमध्ये फेरीवाल्यांचा सर्वे पूर्ण होऊन पुढील प्रक्रिया सुरू असताना लोणावळा शहरांमध्ये मात्र अजूनही सर्वे सुरू झाला नाही, यामुळे संघटनेच्या वतीने सातत्याने पाठपुरवठा करून महापालिकेने तातडीने सर्व करण्याची मागणी करण्यात आली होती ही मागणी मंजूर करत नगरपालिकेने सर्वे सुरू केलेला आहे, यामुळे आता नगरपालिका हद्दीमध्ये व्यवसाय करणाऱ्या सर्व टपरी पथारी हातगाडी धारकांचा जाग्यावर ऑनलाइन सर्वे होणार असून या सर्वेमध्ये जास्तीत सर्व लाभार्थीने योग्य ते कागदपत्रासह आपला स्वतःचा सर्वे करून घ्यावा, नगर पालिका अधिकारी ज्यावेळेस सर्व साठी येथील त्यावेळेस योग्य ते कागदपत्र जवळ बाळगावे असे आवाहन मावळ तालुका अध्यक्ष गणेश चव्हाण यांनी केले आहे,
वसंत काळोखे
अध्यक्ष -: टपरी पथरी हातगाडी पंचायत लोणावळा शहर