मुंबई : पुणे-मुंबई मार्गावर सिंहगड एक्सप्रेस गेल्या १९ महिन्यांपासून बंद होती ही रेल्वेगाडी प्रशासनाने कोरोनामुळे बंद केली होती. ती आज पासून सुरू झाली आहे. आज स्टेशन मास्तर यांनी गाडीच्या पाटी ला हार घालून स्वागत केलं. आज पासून ही गाडी मुंबई व पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली आहे.
पुण्यावरून ही रेल्वेगाडी (क्र. 01009) सकाळी ६ वाजून ०५ मिनिटांनी निघाली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी पोहचली.
ही गाडी शिवाजीनगर, खडकी, पिंपरी, चिंचवड, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे, दादर या स्थानकांवर थांबेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही गाडी (क्र. 01010) सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी निघेल आणि रात्री १० वाजता पुण्यात पोचेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
पुणे व मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबईला ये-जा करण्यासाठी ही गाडी महत्वाची असल्याचे पुणे-मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे संस्थापक सचिव व मध्य रेल्वे,पुणे विभागाचे समिती सदस्य प्रकाश संकपाळ यांनी सांगितले आहे.