पिंपरी : पुनावळे येथे २० वर्षापूर्वी कचरा डेपोचे आरक्षण टाकून काही बिल्डर व राजकारणी लोकांनी पुनावळे व आजूबाजूच्या गावांचे जमिनीचे भाव पाडले. त्यानंतर याच बिल्डरांनी व राजकारणी लोकांनी हजारो एकर जमीन कवडीमोल भावाने खरेदी केली. त्यानंतर प्रशासनाला हाताशी धरून कचरा डेपोची जागा ताब्यात घेण्यास २० वर्षे विलंब केला. त्यामुळे आयुक्त यांनी बिल्डर व राजकारणी लोकांचा डाव पुनावळे कचरा डेपोची जागा ताब्यात घेवून उधळून लावावा.
मोशी कचरा डेपोची क्षमता संपली आहे. पुनावळे येथे ७४ एकर वनखात्याची जमिनीवर कचरा डेपोचे आरक्षण आहे . या जमिनीच्या मोबदल्यात शासनाला अंदाजे ४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच पिंपरी संडास येथे वनविभागाला पर्यायी जागा देण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे आयुक्तसाहेब आपण लवकरात लवकर शासनाकडे पाठपुरावा करून हि ७४ एकर जागा ताब्यात घ्यावी.
२० वर्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जे जे आयुक्त होऊन गेले ते हि जागा ताब्यात घेवू शकले नाही. परंतु आयुक्त साहेब आपली काम करण्याची क्षमता व अंदाज पासून आपण हि पुनावळे कचरा डेपोची जागा ताब्यात घेवून बिल्डर व राजकारणी लोकांचा डाव उधळून लावावा असे सामाजीक कार्यकर्ते रमेश नानासाहेब वाघेरे यांनी कळविले.