मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. एनसीबीला पैसे देण्यासाठी किरण गोसावी आणि सॅम नावाचा व्यक्ती शाहरुखच्या मॅनेजरला भेटले. त्यावेळी त्यांच्यात पैशांची बोलणी झाली होती. त्यानंतर एका व्यक्तीकडून 50 लाख रुपये घेतल्याचा खुलासा किरण गोसावीच्या बॉडीगार्डने खुलासा केला आहे.
‘साम’ वृत्तवाहिनीने दिलेल्या exclusuve वृत्तात हा दावा केला आहे. गोसावी सध्या फरार असून पोलिसांनी त्याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याला अटक केली आहे. प्रभाकरचे अफिडेविट सामच्या हाती लागले आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी कार्डिलिया क्रुझवर छापेमारी करत आर्यनसह काही जणांना अटक केली. यावेळी त्यांनी ज्या पंचाच्या सह्या घेतल्या आहेत, त्यामध्ये गोसावीसह प्रभाकरचंही नाव आहे.
प्रभाकरच्या अफिडेविटमध्ये याबाबतचे खुलासे करण्यात आले आहे. आर्यनला एनसीबीच्या कार्यालयात आणल्यानंतर काही वेळाने गोसावीला सॅम नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. त्यानंतर वेगवेगळ्या गाड्यांमध्ये आम्ही एका ठिकाणी गेलो. तिथे एका निळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये शाहरुख खानची मॅनेजर पूजा दडलानी हिला दोघे भेटले. त्यामध्ये त्यांची बोलणी झाली. त्यानंतर गोसावीसह आम्ही दोघे वाशीच्या घरी गेलो. सकाळी पुन्हा ताडदेवला इंडियाना हॉटेलजवळ प्रभाकर आला. तिथे एका गाडीतून 50 लाख रुपये घेऊन पुन्हा वाशीला आल्याचा खुलासा प्रभाकरने केला आहे.
प्रभाकर 50 लाख घेऊन गोसावीला वाशीतील इनऑरबीट मॉलजवळ गेला. तेथून गोसावीने पून्हा पैशाची पिशवी प्रभाकर कडे देऊन ती सॅमला देण्यास सांगितली. त्यानुसार प्रभाकर पैसे घेऊन सॅमकडे गेला. पण त्यावेळी पिशवीत 38 लाख रुपयेच होते. त्यातील 12 लाख नव्हते, असा खुलासाही प्रभाकरने केला आहे.