आर्यन खान ड्रग्स प्रकरण : साक्षिदार किरण गोसावीच्या ‘बॉडीगार्ड’ने केले वृत्तवाहिनीकडे खुलासे

वाचा सविस्तर....

0

मुंबई : क्रूझवर ड्रग्स पार्टीबॉलिवूड बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतरांना

अटकसाक्षीदार किरण गोसावी बाबत

प्रश्नचिन्हनवाब मलिक यांचे आरोपरोज नवनवे खुलासे…. साक्षीदार प्रभाकर साईलची एंट्री….शाहरुखच्या मॅनेजरकडे २५ कोटींचीमागणीएनसीबीच्या समीर वानखेडे यांच्यावर आरोप

वानखेडे तत्काळ दिल्लीला रवानामलिक यांचे 24 कारवायांचा लेटर बाँम्ब आणि शेवटी साइलचे वृत्तवाहिनीवर येऊन खुलासे….

किरण गोसावीचा अंगरक्षक असल्याचा दावा करणाऱ्या प्रभाकर साईलने एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, किरण गोसावी २५कोटींची मागणी करणार होता आणि अखेर १८ कोटींवर तयारी दर्शवणार होता. यातील आठ कोटी समीर वानखेडेंना देण्यात येणारहोते. याशिवाय प्रभाकर साईलने केलेल्या आरोपांनुसार, समीर वानखेडेंनी कारवाई झाली त्यादिवशी ऑक्टोबरला एका कोऱ्याकागदावर स्वाक्षरी करायला लावली होती.

मी साक्षीदार आहे याची मला कल्पना नव्हती. मला बोलावून काही कागदांवर स्वाक्षरी करायला लावली तेव्हाच तिथे गेलो होते. मीजेव्हा कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला तेव्हा समीर वानखेडेंनी मला काही होणार नाही असं आश्वासन दिलं. किरणगोसीवानेही मला स्वाक्षरी करण्यास सांगितलं. तिथे इतके अधिकारी असताना मी वाद कसा घालणार?,” असं प्रभाकर साईलने म्हटलंआहे.

प्रभाकर साईलने आपल्याला नऊ कोऱ्या कागदांवर स्वाक्षरी करण्यास सांगितलं, तसंच अधिकाऱ्यांनी आपल्या आधार कार्डची प्रतघेतल्याचं सांगितलं आहे. “आपण कागदांवर सही केल्यानंतर आर्यन खानलाही करायला लावण्यात आल्याचं पाहिलं. आर्यन खानलाइतरांपासून वेगळं ठेवण्यात आलं होतं. मी व्हिडीओ बनवला आहे त्यात आर्यन गोसावीच्या शेजारी बसलेला दिसत आहे. हे एनसीबीकार्यालयाच्या आतील आहे,” असं प्रभाकर साईलने सांगितलं आहे.

प्रभाकर साईलच्या माहितीनुसार, गोसावी, सॅम डिसूझा आणि शाहरुखची मॅनेजर पूजा यांच्या डील पूर्ण करण्यासाठी कारमध्ये बैठकझाली. “पूजा प्रसिद्ध असल्याने मी तिला ओळखत होता. तिला पाहिल्यानंतर गुगलवर तिचं नावही शोधलं होतं,” असं प्रभाकरनेसांगितलं आहे. आपण गोसावी डिसुझाशी बोलत असताना ऐकलं होतं. यावेळी तो आपण शाहरुखच्या मॅनेजरकडे २५ कोटी मागूयात, १८ कोटींवर सेटलमेंट करुयात आणि त्यातून समीर वानखेडेंना देऊयात असं तो सांगत होतो अशी माहिती प्रभाकर साईलने दिली आहे.

प्रभाकरच्या माहितीनुसार, “कारवाईच्या दुसऱ्या दिवशी ऑक्टोबरला त्याला महालक्ष्मी परिसरातून ५० लाखांची रक्कम घेऊन येण्याससांगण्यात आलं होतं. तिथे पोहोचल्यानंतर दोन लोक होते, त्यांनी बॅग दिल्यानंतर गोसावी आणि त्याची बायको तेथून निघून गेले. ऑक्टोबरला आपण त्याला शेवटचं भेटलो होतो. २१ ऑक्टोबरला त्याने आपल्याला फोन करुन लवकरच आत्मसमर्पण करणारअसल्याचं सांगितलं होतं”.

क्रूझ पार्टीआधी गोसावीने आपल्याला काही फोटो देत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं असं साईलने सांगितलं आहे. आपणलवकरच अनेक पुरावे समोर आणणार असल्याचंही त्याने सांगितलं आहे. आपल्याला सुरक्षेची भीती वाटत असल्याचं त्याने म्हटलं आहे. “माझं आयुष्य धोक्यात आहे. पोलीस आठ ते नऊ वेळा माझ्या घरी आले होते. मी पहिला साक्षीदार आहे. दुसरा फरार असून तिसराभाजपा कार्यकर्ता आहे. मी प्रामाणिक असून कोणीही मला पाठिंबा देत नाही आहे. म्हणूनच मी सुरक्षेची मागणी केली,” असल्याचंप्रभाकरने सांगितलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.