पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत दहावी-बारावी आणि आयआयटी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तब्बल 199 जागांसाठी ही पदभरती लवकरच होणार आहे. यासाठीची अधिसूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेंटिशीप या जागेच्या विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अप्रेंटिशीप (Apprentice in various Trades) – एकूण जागा 199

अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांकडे दहावी, बारावी आणि ITI पर्यंत शिक्षण असणे अनिवार्य आहे. तसेच उमेदवारांनी संबंधित ट्रेडनुसार शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अप्रेंटीशीप केलेल्या उमेदवारांना आता पुन्हा या पदभरतीसाठी अर्ज करता येणार नाही.

2019 ते 2021 या शैक्षणिक वर्षांत पास झालेल्या उमेदवारांनाच या पदभरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

मराठी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

शैक्षणिक गुणांनुसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

उमेदवारांसाठी प्रशिक्षण कालावधी हा एक वर्षांचा असणार आहे.

प्रशिक्षणासंबंधीचे आणि निवडीसंबंधीचे संपूर्ण अधिकार हे महानगरपालिकेकडे असणार आहेत.

अप्रेंटिशीप – संबंधित पदांनुसार 7000 – 8000 रुपये प्रति महिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 नोव्हेंबर 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pcmcindia.gov.in/jobspcmc.php या लिंकवर क्लिक करा. 

Leave A Reply

Your email address will not be published.